लेह, 26 डिसेंबर (हिं.स) : जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये आज, मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता लेहमध्ये 4.5 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 3.7 इतकी मोजली गेली.
जम्मू-काश्मीर आणि किश्तवाडमध्ये भूकंप जाणवले. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात मंगळवारी पहाटे 3.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. एनसीएसनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी 1.10 वाजता भूकंप 5 किमी खोलीवर झाला. एनसीएसच्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 33.36 आणि रेखांश 76.67 वर आढळला. लेह भागात मंगळवारी पहाटे ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली. एनसीएसच्या मते, भूकंप पहाटे 4.33 च्या सुमारास 5 किमी खोलीवर झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू 34.73 अक्षांश आणि 77.07 रेखांशावर आढळून आला.
यापूर्वी 18 डिसेंबर रोजी लडाखमध्ये 15 मिनिटांत तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 मोजण्यात आली आणि त्यानंतर कमी तीव्रतेचे 2 धक्के जाणवले. याशिवाय जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.
हिंदुस्थान समाचार
