नासिक, २५ डिसेंबर (हिं.स.) : राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आज, सोमवारी पुन्हा एकदा काळे झेंडे दाखवण्यात आले. भुजबळ सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी भरवस फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे टाकून निषेध व्यक्त करण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्याचे पुरवठा मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे विरोध करीत असे आहेत या भावनेतून सातत्याने विरोध होत आहे या विरोधातून दोन दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या तपोवन येथे एका धार्मिक कार्यक्रमांमध्ये भुजबळ यांचे भाषण सुरू झाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते ही घटना ताजी असतानाच सोमवारी छगन भुजबळ हे चांदवड येथे एका लग्नासाठी जात होते त्यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भरवस फाटा येथे डॉक्टर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 25 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन छगन भुजबळ यांचा ताफा जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस येईपर्यंत हे कार्यकर्ते तिथून निघून गेले होते.
हिंदुस्थान समाचार
