सोलापूर 14 डिसेंबर ( हिं.स)
शेतीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्याची हत्या करत तसेच त्याचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन बाईकवरुन गावात फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी चारपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. माढा पोलिसांत हजर करण्यात आलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या हत्याकांडातील आरोपी शिवाजी जाधव हा स्वतः अकलुज पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलीसांनी अटक केली. यातील हत्या करण्यात आलेली व्यक्ती शंकर जाधव (65) यांचं धडावेगळं केलेले शीर पोलिसांना आढळून आलं, त्यानंतर शवविच्छेदन होऊन दुपारी शेवरे इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मृत शंकर जाधव यांचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर यानं फिर्याद दिली होती. यात शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
हिंदुस्थान समाचार
