ठाणे, 9 डिसेंबर (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या देशभरातील कनार्टक, गुजरात, चंदीगड, जम्मू-काश्मीर, बिहार, झारखंड अशा विविध राज्यातील लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीव्दारे थेट संवाद साधला. श्री.मोदी यांनी या संवादातून शासनाच्या विविध योजना व योजनांचे लाभ याविषयी लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेतले. संपूर्ण देशातील नागरिक ‘विकसित भारत संकल्प यात्रे’शी जोडले गेले आहेत. ‘विकसित भारत’ हा संकल्प सत्यात आणण्यासाठी प्रत्येक भारतीय मनापासून प्रयत्न करताना दिसत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ वंचितांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. काल्हेर ग्रामस्थ प्रधानमंत्र्यांच्या या संवादामुळे प्रेरित झाल्याचे चित्र दिसत होते.
हिंदुस्थान समाचार
