नवी दिल्ली, 09 डिसेंबर (हिं.स.) : जगभरात हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना साथरोगाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 148 नवे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीत आज, शनिवारी ही माहिती देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने आज,सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या 808 वर पोहोचली आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण संख्या 4 कोटी 50 लाख 2 हजार 889 झाली आहे. तर मृतांची संख्या 5 लाख 33 हजार 306 आहे.त्याचवेळी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये 4 कोटी 44 लाख 68 हजार 775 लोक संसर्गातून बरे होऊन घरी परतले आहेत, ही दिलासादायक बाब असल्याचे म्हटले आहे. देशात संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण 98.81 टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण केवळ 1.19 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशभरात अँटी-कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.कोरोनानंतर, चीनमध्ये एक रहस्यमय न्यूमोनियाचा संसर्ग पसरत आहे आणि देशात काही प्रकरणे देखील आढळून आली आहेत, ज्याबद्दल केंद्राने आधीच अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, देशात एकाच दिवशी कोरोनाचे 148 नवे रुग्ण आढळल्यामुळे चिंतेत वाढ झालीय.
हिंदुस्थान समाचार
