पुणे, 7 डिसेंबर, (हिं.स) एसटी महामंडळातर्फे ३० डिसेंबर रोजी शिवाजीनगर आगारातून अष्टविनायक दर्शन साधी बससेवा देण्यात येणार आहे. ही बस वाकडेवाडी स्थानकावरून सकाळी सात वाजता निघेल. ओझर येथील भक्तनिवास येथे मुक्काम करून ३१ डिसेंबर रोजी रात्री १० पर्यंत शिवाजीनगर येथे परत येईल.
या यात्रेसाठी प्रति प्रवासी ९९० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, जेवणाचा व इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करायचा आहे. ही सेवा आरक्षण प्रणालीमध्ये ATHVNK या सांकेतिक कोडनुसार उपलब्ध आहे. तसेच www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरूनही या सहलीचा लाभ घेता येईल. प्रवाशांनी या अल्प दरातील सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजीनगर आगाराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
