सोलापूर 29 नोव्हेंबर ( हिं.स) : चारित्र्याच्या संशयावरून शिक्षिका पत्नी आणि १२ वर्षीय मुलाचा खून करून शिक्षकाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बार्शी शहरात घडली. शिक्षक मानसिक रुग्ण होता. बार्शी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.सोन्यासारखा संसार सुरू होता, पती-पत्नी दोघेही शिक्षक अन्अवघ्या बारा वर्षाचा गोंडस मुलगा. पण पत्नीने नोकरी करू नये, यावरुन दोघांमध्ये तंटा होत असे. तसेच पत्नीबद्दल संशयाचे भूतही शिक्षकाच्या मनात घोंघावत होते. शिक्षक मानसिक रुग्ण होता आणि यातूनच त्याने पत्नी, मुलाचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करीत संसार उद्ध्वस्त केला. अतुल सुमंत मुंढे (वय ४२ रा. नाईकवाडी प्लॉट) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
हिंदुस्थान समाचार
