ठाणे, २३ नोव्हेंबर, (हिं.स) जिल्हा परिषद ठाणे च्या गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी माहे मार्च २०१९ व माहे ऑगस्ट २०२१ (अपंग व इतर सुधारीत आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत गट – क संवर्गातील पदे भरती करीता www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरात, परिक्षा व संपुर्ण भरती प्रक्रीया रद्द करण्यात आली होती.
सदर भरती करता अर्ज प्राप्त संख्या ११ हजार ५८८ इतकी होती. पदभरती रद्द झाल्यामुळे उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी दिनांक. ०५/०९/२०२३ रोजी पासुन जिल्हा परिषद ठाणे च्या संकेस्थळावर परिक्षा उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांच्याकडे असलेले युजर आयडी व पासवर्डचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने परत मिळण्यासाठी कळवण्यात आले होते.
संकेतस्थळावर प्राप्त माहितीनुसार दि. ३१ ऑक्टोंबर २०२३ या कालाधीतील १ हजार ४४७ अर्जदारां पैकी ज्यांनी परिपुर्ण माहिती संकेतस्थळवर भरली होती त्या ७४४ उमेदवारांना परिक्षा शुल्क पोटी रक्कम २ लक्ष १४ हजार २५० रुपये परत करण्यात आली आहे.
अद्याप ज्या उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क मिळण्यासाठी अर्ज केलेले नाही त्यांनी युजर आयडी व पासवर्डचा वापर करून जि.प. च्या https://maharddzp.com या संकेतस्थळावर ऑनलाईन (online) पध्दतीने त्यांच्या बँक खात्याचा तपशील भरावा. जेणेकरून परिक्षा शुल्क पोटी असलेली रक्कम परत मिळेल.
हिंदुस्थान समाचार
