अमरावती, 25 ऑक्टोबर (हिं.स.) : डॉ. पंजाबराव देशमुख यांना पर्यावरणाविषयी खूप काळजी होती आणि त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि टिकाऊपणाला चालना देण्यासाठी काम केले. ते शाश्वत शेती पद्धतीचे खंबीर पुरस्कर्ते होते. आणि सेंद्रिय शेती तंत्राच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काम केले.
महाराष्ट्र राज्यात अनेक राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. आज सोने समर्पण निमित्ताने त्यांच्या थोर विचारांचा वसा घेऊन आपण सर्व कार्यरत राहूया,असा निर्धारपूर्ण-निश्चय व्यक्त करीत आपण डॉ. पंजाबराव देशमुख यांना आदरांजली अर्पण करत आहोत.असे प्रतिपादन आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सोने अर्पण सोहळ्यात उपस्थितांना संबोधून केले. मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारे संचालित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र,शिवाजी नगर येथे आयोजित सोने अर्पण सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष-हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौ. सुलभाताई खोडके ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते,विधिमंडळ समन्वयक-संजय खोडके, उपस्थित होत्या.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष-ऍड. गजाननराव पुंडकर,ऍड.जयवंत उपाख्य भैयासाहेब पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर,कोषाध्यक्ष-दिलीपाबाबू इंगोले,कार्यकारिणी सदस्य-हेमंत काळमेघ,केशवराव गावंडे,सुरेशदादा खोटरे, सुभाष बनसोड, संस्थेचे सचिव-डॉ. विजय ठाकरे,स्वीकृत सदस्य-डॉ. महेंद्र ढोरे,नरेशचंद्र पाटील,डॉ. पी. एस. वायाळ, डॉ. अमोल महल्ले, या सोहोळयाला प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष-हर्षवर्धन देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन आ.सौ.सुलभाताई खोडके यांचे स्वागत केले. यावर्षी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संस्थेचे ‘ शिवसंस्था ‘ नावाचे जे त्रेमासिक होते ते आता मासिक करण्याचा संकल्प करून तो अमलात आणला आहे. या सोने अर्पण सोहोळा निमित्ताने सर्व मान्यवर अतिथींच्या हस्ते शिवसंस्था या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला आ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत सर्व मान्यवर अतिथींच्या वतीने पुष्पचक्र व सोने अर्पण करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन उपाख्य भैयासाहेब देशमुख यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला.
हिंदुस्थान समाचार
