cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Entertainment

दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

CliQ INDIA
Last updated: November 16, 2023 11:30 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.) विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नंदेश विठ्ठल उमप यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यंदाचा १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६.०० वा संपन्न होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो.

सुदेश भोसले (संगीत विभाग), आतांबर शिरढोणकर (लोकसंगीत), अनुराधा भोसले (सामाजिक कार्य), सुमित राघवन (अभिनय क्षेत्र), चिन्मयी सुमित (अभिनय क्षेत्र), केतकी माटेगावकर (नवोन्मेष) या मान्यवरांना ही या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे, श्रीमती नीलम गोऱ्हे (उपसभापती ), श्री. उदय सामंत (उद्योग मंत्री), अॅड आशिष शेलार (भाजपा, मुंबई अध्यक्ष), श्री.अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी, ठाणे), श्री.अभिजीत बांगर (आयुक्त, ठाणे), श्री. संदीप माळवी (अतिरिक्त आयुक्त, ठाणे) आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ.सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कवितांचा विशेष कार्यक्रम या सोहळ्यात संपन्न होणारअसून शाहीर बापू जाधव यांच्या लोककला शाहिरीचा तसेच खुशाबा यांच्या आदिवासी नृत्याचा आस्वादही रसिकांना या सोहळ्यादरम्यान घेता येईल.

बाबांनी लोककलेसाठी आपलं आयुष्य वेचलं. जेव्हा ते रंगमंचावर उभे राहायचे तेव्हा एक ‘चैतन्य’ संचारायचं. याच ‘चैतन्या’चा शोध घेत विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले.

या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवास १२ जानेवारीपासून प्रारंभ
मनीषा कोईरालाच्या हस्ते ‘सोसायटी अचिव्हर्स’च्या नवीनतम कव्हरचे भव्य अनावरण | BulletsIn
क्रांतिज्योतीच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रपटाच्या शो चे आयोजन
‘सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास!
IMDb द्वारे 2024 च्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट व वेब सिरीजची घोषणा | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल पंतप्रधानांकडून भारतीय संघाचे अभिनंदन
Next Article सोलापूर : गोळी झाडून पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?