नाशिक, ०५ नोव्हेंबर (हिं.स.) शिंदे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या रंग बनविणाऱ्या कंपनीला रविवारी सायंकाळी अचानक आग लागली ही आग विझवण्यासाठी महानगरपालिकेची अग्निशमन विभाग प्रयत्न करीत आहे
शिंदे गावात असलेल्या रंग बनविणाऱ्या एक मोठ्या कंपनीला आग लागली असून आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तुरुपत केमिकल्स या ऑईल पेंट रंग बनविण्याची कंपनीत आग लागली. आगीची माहिती मिळताच नाशिक मुख्यालय नाशिकरोड, सिडको आदी ठिकाणाहून अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी पोहोचले असून आग विजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे नेमके कारण समजले नसून शॉट सर्किट मुळे आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑईल पेंट रंग असल्याने त्यातील केमिकल मुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत होती. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.शिंदे हे औद्योगिक क्षेत्र अलीकडच्या काळामध्ये ललित पाटील यांनी बनविलेल्याड्रग प्रकरणाने चर्चेला आलेले औद्योगिक क्षेत्र आहे
हिंदुस्थान समाचार
