जळगाव, 5 नोव्हेंबर, (हिं.स.) बॅकेतून दोन लाख रुपयांची रोकड काढून ती पिशवीत ठेऊन घराकडे जाणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला दोन भामट्यानी पळत ठेऊन त्यांची पिशवी हिसकावून पोबारा केल्याची घटना मुक्ताईनगर येथे घडली असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पिंप्रीपंचम येथील शेतकरी भगवान विश्वनाथ पाटील (वय-65, रा. पिंप्रीपंचम ता. मुक्ताईनगर) हे कामानिमित्त शहरात आले असता त्यांनी बँकेतून २ लाख रुपये काढून ते मुक्ताईनगर शहरातील पूजा सुपर शॉपी समोर रस्त्याने पायी जात दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या हाताला झटका देऊन पिशवी घेऊन पसार झाले .याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.
हिंदुस्थान समाचार
