नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : दक्षिण भारतात येत्या 4 दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये 3 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज, गुरुवारी हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु, इतर भागातील हवामानात मोठा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केलेय.
गेल्या 24 तासात अंदमान आणि निकोबार बेट, केरळ, तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. त्याचवेळी, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे येथे 2 ते 6 नोव्हेंबर आणि कर्नाटकमध्ये 3 ते 5 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्याचवेळी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, जम्मू आणि काश्मीर, लडाख गिलगिट बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेशमध्ये आणि 3 नोव्हेंबरला पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. याशिवाय, 3 नोव्हेंबरला उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचवेळी, 7 नोव्हेंबरपासून उत्तर हिमालयीन प्रदेशात एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स दार ठोठावत आहे, ज्यामुळे येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
