डोंबिवली, ३१ ऑक्टोबर (हिं.स.) : एका तरुणाचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील मोठागांव जवळील सात पुलालगत रेल्वे रुळाजवळ दिसला. याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार रघुवीर सोभान सिंग ( ३३ ) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांना याच्या कपड्यात पॅनकार्ड मिळाले असून जवळच जुने कपडे असलेली बॅग सापडली. या तरुणाचे पत्ता मिळाला नसून पोलीस माहिती घेत आहेत.
हिंदुस्थान समाचार
