नाशिक, २८ ऑक्टोबर (हिं.स.) :नाशिक पोलिसांनी सोलापूर येथील ड्रग बनविण्याचा कारखाना उध्वस्त केला आहे अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.
अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले की, नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिनांक ०७ सप्टेबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयात प्रथमता आरोपी गणेश संजय शर्मा याचे ताब्यातुन १२.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे तपासात नमुद अंमली पदार्थ हा आरोपी गोविंदा संजय साबळे व आतिश उर्फ गुडडया शांताराम चौधरी यांचेकडुन खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयांत अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान नमुद अंमली पदार्थ खरेदी विक्रीचे मोठे जाळे आरोपी नामें सनी अरूप पगारे वय – ३१ वर्षे, रा- गोसावी वाडी, पगारे चाळ, नवीन बिटको हॉस्पिटलचेमागे, नाशिक रोड नाशिक, व त्याचे साथीदार अर्जुन सुरेश पिवाल, मनोज भारत गांगुर्डे, सुमित अरु पगारे यांचे मार्फत चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध घेवुन त्यांना नव गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान सखोल तपास करता आरोपी मनोज भारत गां याचेकडुन १ किलो २७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ व आरोपी सनी पगारे याचेकडुन २ वि ६३ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ तसेच आरोपी नामे अर्जुन सुरेश पिवाल याचेकडुन ५८ वजनाचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीकडे मिळुन आलेल्या व्य मात्रेतील अंमली पदार्थाच्या अनुषंगाने अधिक तपास करता, त्यांनी सदरचा अंमली पदार्थ हा सापडला होता.
त्यावर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक फड, बांगर, नागरे, रॉदळे व पथक यांनी सोलापूर येथे जावुन कारखान्यावर छापा घातला असता, नमुद अटक आरोपी व गुन्हयात पाहिजे आरोपी हे सोलापुर येथे अंमली पदार्थाची निर्मिती करीत असलेल्या कारखाण्यातुन सुमारे ६ किलो ६०० ग्रॅम वजनाचा सुमारे ०३ कोटी ३० लाख रूपये किंमतीचा मुददेमाल त्यासोबत एम डी पावडर सदृश्य अंमली पदार्थ १४ किलो २४३ ग्रॅम वजनाचा सुमारे ०२ कोटी ८४ लाख ८६ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल तसेच ३० किलो वजनाचा कच्चा माल सुमारे ६० लाख रूपये किंमतीचा मुददेमाल, अंमली पदार्थ निर्मिती करीता लागणारे द्रव रसायन सुमारे १० लाख रूपये किंमतीचे व सुमारे २५ लाखाची साहित्य साधने असा एकुण ७ कोटी ९ लाख ८६ हजार -किंमतीचा मुददेमाल हस्त करून, अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उभारण्यात सहभाग असलेला नाशिक येथील इसम मनोहर पांडुरंग काळे व सोलापुर येथील एक इसम यांना चौकशी कामी ताब्यात घेतलेले आहे. नमुद गुन्हयात अजुनही सखोल तपास सुरू असुन अंमली पदार्थाचा कारखाना उभारण्या करीता अटक आरोपी न्यांना सदर व्यवसायात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांचा पाठिंबा असुन त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न करून, कठोर कारवाई करण्याची कामगिरी सुरू आहे. सदर गुन्हयात आतापावेतो ०८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उध्वस्त केल्यामुळे नाशिक शहरात होणा-या अंमली दार्थाचा विक्रीस लगाम घातला आहे.
हिंदुस्थान समाचार
