सातारा, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : येथील श्यामसुंदरी चारिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के .एस.डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजमधील इयत्ता दहावीत शिकणारा शार्विल राजेंद्र माने या आचारी खेळाडूने विशेष प्राविण्य पटकावले आहे .
नुकत्याच अमरावती येथे कंपाउंड राउंड प्रकारात त्याने 17 वर्षाखालील राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले आहे .आणि तो आता शालेय नॅशनल आर्चरी स्पर्धेमध्ये पाचव्या स्थानावर निवडला गेला आहे.
शार्विल याला प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रवीण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक अभिजीत मगर यांच्या हस्ते शार्विलचा सत्कार करण्यात आला. शार्विलने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत मिळवलेल्या या प्राविण्याबद्दल त्याचे के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त उषा शानभाग, संचालिका आचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार
