नाशिक, १६ ऑक्टोबर, (हिं.स.) : नवरात्रीचा प्रत्येक दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांपैकी एक किंवा दुसर्याी रूपाशी संबंधित आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणीशी संबंधित आहे, देवीचे दुसरे रूप. आज देवी ब्रह्मचारिणीच्या रूपात पूजन होते. येथे ”ब्रह्म” शब्दाचा अर्थ तपश्चर्या आणि ”ब्रह्मचारिणी” म्हणजे जो तपस्या करतो. देवीचे हे रूप शाश्वत फल देणारे आहे. आजच्या दिवशी जो कोणी देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतो तो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात विजय मिळवण्याची शक्ती मिळवू शकतो, असे म्हटले जाते. यामुळे व्यक्तीमध्ये संयम, कठोर परिश्रम घेण्याचे मनोबल देखील वाढते. त्याच आनुषंगिक उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर श्री भगवती अर्थात सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला (दि.१५) प्रारंभ झाला. आज सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेच्या मुहूर्तावर सुमारे २५ -३० हजार भाविकांनी गडावर हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले व श्री सप्तशृंगी देवीच्या चरणी लिन झाले आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगड येथे सप्तशृंगी देवीचा अश्विन नवरात्रोत्सवातील दुसऱ्या माळेची पूजाही आमदार नितीन पवार, जयश्री पवार व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ऍड. ललित निकम यांच्या हस्ते श्री भगवतीस पंचामृत अभिषेक, महापूजा करण्यात आली.तसेच रावसाहेब दानवे ही श्री भगवती चरणी नतमस्तक झाले व त्याच्या हस्ते भगवतीची संकल्प आरती सुधा करण्यात आली घटस्थापनेच्या विधिवत पूजेने रविवार नवरात्र उत्सव यात्रेला सुरुवात झाली. तसेच विश्वस्त संस्थेच्या प्रसादालयात नि-शुल्क भाविकांना प्रसादाची तथा भोजनाची व्यवस्था ही ट्रस्ट व देणगी दार भाविकांच्या वतीने करण्यात आली आहे याप्रसंगी विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यकारी अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख मंदिर सहा.विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, पर्यवेक्षक निकम, सुनील कासार यांसह ट्रस्ट कर्मचारी, ग्रामस्थ तथा भाविक उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
