मुंबई, 12 ऑक्टोबर ‘भारताची तिजोरी’ म्हणून ओळखले जाणाऱ्या गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सच्या ‘देश की तिजोरी’ अभियानाचे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या हस्ते अनावरण झाले. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉइसचे व्यापार युनिट असलेले गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स त्यांच्या सिक्युर ४.० (Secure 4.0) व्यासपीठाद्वारे कल्पकता आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपायांवर लक्ष केंद्रित करत आहे.
गोदरेजने १९०२ सालामध्ये बनविलेल्या पहिल्या भारतीय लॉकरपासून (मेड इन इंडिया) ते आजच्या अगदी नवीनतम डिजिटल लॉकर्सपर्यंत गोदरेजच्या उत्पादनांनी भारतात घरोघरी आपले एक वेगळे स्थान कसे निर्माण केले हे ‘देश की तिजोरी’ अभियान लोकांपर्यंत पोहोचवते. गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. पुष्कर गोखले यांनी सांगितले की, आजच्या बदलत्या पद्धतीमध्ये घरमालक घराची सजावट आणि सौंदर्यशास्त्र यालाच केंद्रस्थानी ठेऊन त्यास जास्त महत्त्व देतात. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडायच्याआधी घराच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे महत्व ग्राहकांना सांगणे व त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे अत्यावश्यक आहे. शिवाय, सध्या स्मार्ट होम उपकरणांकडे ग्राहकांचा कल असल्याने होम सेक्युरिटी ब्रॅंड देखील स्मार्ट होम तंत्रज्ञानपूरक असणे गरजेचे आहे; कारण आज ग्राहक तंत्रज्ञानाधिष्ठित उपाय निवडत आहेत.
व्हॅनच्या आत तयार केलेले स्मार्ट होम व्हिडीओ डोअर फोनपासून ते होम सेक्युरिटी लॉकरपर्यंत, होम सेक्युरिटी कॅमेऱ्यांपासून ते सीसिटीव्ही कॅमेऱ्यांपर्यंत विविध स्मार्ट होम सुरक्षा उत्पादनांची एक सर्वसमावेशक श्रेणींचे प्रदर्शन करते. व्हॅनच्या आत तयार केलेले हे स्मार्ट होम एका अशा अतिशय कार्यक्षम उपक्रमाचे प्रतिनिधीत्व करते ज्या उपक्रमाचा उद्देश घर मालकांना स्मार्ट होम सुरक्षा उपाय वापरण्यासाठी प्रेरणा देणे आणि त्यासंबंधी मार्गदर्शन करणे हा आहे.
गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “एक ब्रॅंड म्हणून ज्याने केवळ भारतातील घरेच नाही तर बँकिंग क्षेत्र, ज्वेलरी क्षेत्र किंवा अभ्यागत व आदरातिथ्य (हॉस्पिटलिटी) अशा अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांच्या सुरक्षिततेसाठी अव्याहतपणे काम केले आहे त्या गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सच्या सिक्युर ४.० (Secure 4.0) च्या अंतर्गत आम्ही ज्या नवकल्पना ग्राहकांसाठी आणत असतो त्यांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहून मला अतिशय आनंद होत आहे.
लोकांनी अनेक दशकांपासून ज्या उत्पादनांवर विश्वास ठेवला आहे व जी उत्पादने कालानुरूप धोके आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन सातत्याने विकसित होत आहेत अशा उत्पादनांना लोकांसमोर मांडणे हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित ब्रॅंड्सपैकी एक असलेल्या गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचा ‘देश की तिजोरी’ हा उपक्रम चालू करण्यामागील विचार आहे.
गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. पुष्कर गोखले पुढे म्हणाले, “या उपक्रमाचा एक भाग म्हणून, गृह सुरक्षेसंबंधीची आमची नवीनतम कल्पक उत्पादने लोकांसमोर मांडण्यासाठी आम्ही खास ‘चार (4) व्हॅन्स (“four (4) Vans”) तयार केली आहेत. या व्हॅन्स मुंबईपासून चालू करून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण असा चारी दिशांना प्रवास करतील. या व्हॅन्सच्या द्वारे १०० दिवसांपेक्षा कमी कालावधीमध्ये भारतातील १०० शहरांमध्ये होम सेक्युरिटीविषयक जागरूकता पसरविणे आणि ग्राहकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करणे हे आमचे लक्ष्य आहे. मला अतिशय आनंद होत आहे की, आमचा ब्रॅंड अॅम्बेस्डर आयुष्यमान खुराना आज आमच्या सोबत आहे. मनःशांती मिळविण्यासाठी गृह सुरक्षेमध्ये गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे या बाबतच्या आमच्या विचारांना आयुष्यमान खुराना भारतीय घरांमध्ये पोहोचवतो.”
गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचा ब्रॅंड अॅम्बेस्डर आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुराना यावेळी म्हणाला, “सतत प्रवास करणाऱ्या आणि अधिकाधिक वेळ घराबाहेर असणाऱ्या मला आपल्या घराच्या व त्याच्या आसपासच्या सुरक्षिततेचे महत्त्व पूर्णपणे समजते. कित्येक भारतीयांप्रमाणे मी देखील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गोदरेज सोबत मोठा झालो आहे आणि त्यामुळेच गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सबरोबर जोडले जाणे हा माझ्यासाठी खरोखरच एक सन्मान आहे. मला अजूनही माझ्या घरात असलेली एक जुनी ‘तिजोरी’ आठवते जी घरातील मौल्यवान वस्तु नीट सुरक्षित ठेवण्यासाठीचे प्रतीक मानली जात असे. आज जेव्हा मला तंत्रज्ञानाधिष्ठित आणि डिजिटलीपूरक अशी उत्पादने जास्त हवी आहेत तेव्हा देखील मी माझ्या ‘मनःशांती’साठी (peace of mind) गोदरेज ‘तिजोरी’वर विश्वास ठेवू शकतो याचा मला आनंद वाटतो. केवळ फरक एवढाच की आता माझ्याकडे अतिशय मस्त असे बायोमॅट्रिक स्कॅनर असलेले गोदरेज डिजिटल लॉकर आहे. आजचे हे अभियान अगदी हेच दाखवते की, तिजोरी किंवा गोदरेज होम लॉकर निरंतर काळानुरूप विकसित होत आहे. गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स केवळ भारतीय घरांसाठीच नाही तर भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी सातत्याने कसे नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करत आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. कारण ग्राहक म्हणून आपण या सर्व क्षेत्रांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जोडलेले असतो. आपली हीच इच्छा असते की आपले घरातील लॉकर असो वा बँकेतील लॉकर असो ते सर्वोत्कृष्ट पद्धतीने सुरक्षित असावे.”
कल्पकता, नावीन्य आणि सुरक्षितता यांच्या वचनबद्धतेसह गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स व्यवसायांच्या व लोकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक उत्पादने बाजारात आणून या उद्योग क्षेत्रातील मानके नव्याने ठरवित राहील. सिक्युर ४.० (Secure 4.0) अभियान हे लोकांना बदलत्या धोक्यांबद्दल माहीत करून देणे आणि वापरकर्त्यांना नवीन व अधिक उत्तम सुरक्षा उपाय घेण्यासंबंधी जागृत करणे यासाठी गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स करत असलेल्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग आहे.
