अभिनेत्री कंगना रनौत यांच्या हस्ते झाला सन्मान
अहमदनगर, 8 ऑक्टोबर :- मुंबईच्या नोवोटेल हॅाटेलमध्ये आयोजित शानदार सोहळ्यात १८० विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ दीपक हरके यांना भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत यांच्या हस्ते इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्डस २०२३ ने सन्मानित करण्यात आले.यावेळी वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी क्रीना दीदी,राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी डॅा सुवर्णा दीदी,राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी डॅा त्रिवेणी दीदी ऊपस्थित होते.इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्डस २०२३ पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ दीपक हरके यांचे अभिनंदन केले आहे.
