नाशिक, ८ ऑक्टोबर – नाशिक शहरात गुंडांवर कारवाई करणे सुरू असून नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन मधील सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन गुंडांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
सातपूर येथील दोन गुंडावर पोलीसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. आकाश भाउसाहेब महाले, वय २१, रा. वाढोली ता. अंबकेश्वर, जि. नाशिक. व संतोष विठ्ठल पालवे, वय ३२, रा. महालक्ष्मी चौक, प्रबुध्दनगर, सातपूर ही दोन नावे कारवाई केलेल्यांची आहे. नाशिक यांनी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत दहशत कायम रहावी यासाठी हे गुन्हेगारी कृत्य करत होते. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मधील 55 जणांना हद्दपार करण्यात आले आहे यासह वेगवेगळे कारवाई देखील करण्यात येत आहे.
