सातारा, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेमार्फत निमा मॅरेथॉन 2023 या स्पर्धेचे आयोजन रविवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी करण्यात आलेले आहे . नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेमार्फत ही निमा रन 2023 घेतली जाणार आहे . या स्पर्धेसाठी जवळपास 600 स्पर्धक सहभागी झालेले आहेत.
या स्पर्धेचा एक्सपो शाहू स्टेडियम येथे योगा हॉलमध्ये दिनांक 4 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी चार या वेळेमध्ये होणार आहे.
या स्पर्धेसाठी सातारा मधील चंदुकाका सराफ, युनिक डायग्नोस्टिक, गौरीशंकर डायग्नोस्टिक, धन्वंतरी डायबिटीस सेंटर, संजीवनी आयसीयू, आधार हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, दिवेकर हॉस्पिटल, मंगलमूर्ती हॉस्पिटल, अजिंक्यतारा हॉस्पिटल, श्वास हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल, मोकाशी ऑर्थो हॉस्पिटल, डॉक्टर श्रीधर पवार, पीएनजी, श्री मंगेश धबधबे विन विन टेक्नॉलॉजी, शिवकृपा सहकारी पतसंस्था पिढी सातारा या सर्वांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे.
या स्पर्धेला प्रमुख अतिथी सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ.संदीप काटे हे असणार आहेत. त्याचबरोबर साताऱ्यातील पहिल्या महिला कॉम्रेड रनर डॉक्टर अश्विनी देव याही येणार आहेत. तसेच जिल्हा विधी व न्याय अधिकारी राजेश पेनुरकर, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर हेही या स्पर्धेसाठी उपस्थित असणार आहेत.
या स्पर्धेच्या एक्सपोमध्ये 4 नोव्हेंबर रोजी दुपारी चार नंतर काही मर्यादित लोकांना स्पॉट एंट्री मिळणार आहे. स्पॉट registration ची संख्या मर्यादित असल्यामुळे जो प्रथम येईल त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तरी या सर्वांनी लाभ घ्यावा ही आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
