सातारा, 17 डिसेंबर (हिं.स.) : आजच्या धावपळीच्या युगात आरोग्यसाठी आणि तुमच्या पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी ही खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. आज देश पातळीवर विविध शासकीय नोकऱ्या मिळवताना या खेळाच्या सर्वांगीण विकासाने विविध स्तरावर चमकलेल्या खेळाडूंना अधिकार पदाच्या शासकीय नोकरी मिळत आहेत .त्यामुळे खेळाला आरोग्यदायी जीवनाबरोबरच तेवढेच अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन माधवराव तारळकर यांनी केले.
सातारा येथील १२५ वा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजऱ्या करणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणेचे न्यू इंग्लिश स्कूल, सातारा चा यावर्षीचा वार्षिक क्रीडा महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी तारळकर यांनी उपस्थित शालेय मुलामुलींना मार्गदर्शन केले .
या महोत्सवाचा प्रारंभ न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी कुरणेश्वरपासून काढण्यात आलेल्या क्रीडा ज्योतीच्या स्वागताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून तसेच आकाशात कबुतरे सोडून या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. शालेचे शाळा प्रमुख एकनाथ बोरसे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर उपशाला प्रमुख सुजाता पाटील पर्यवेक्षक अंजली गोरे, विनया कुलकर्णी, शालेय क्रीडा महोत्सवाचे प्रमुख चंद्रशेखर पानसकर न्यू इंग्लिश स्कूलचे शाळा प्रमुख एकनाथ बुरसे, क्रीडा महोत्सव प्रमुख चंद्रशेखर पानस्कर, अध्यक्ष, शाला समिती अमित कुलकर्णी, क्रीडा महोत्सव उपप्रमुख संदीप काळे,क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर गुरव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दीप प्रज्वलानंतर शाळेच्या आर्मी आणि नेव्ही, स्काऊट, गाईडच्या विद्यार्थी तुकड्यांनी उपस्थित पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर शाळेच्या विविध वर्गातील शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम ,योगासने, कराटे, मनोरे यांचे सुंदर प्रात्यक्षिक उपस्थित आपले सादर केले. शाळेच्या माजी विद्यार्थिनी मीनाक्षी मोरे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुरेख कराट्याची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना अचंबित केले .याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर्णा भोसले यांनी केले तसेच क्रीडा सोहळा प्रमुख चंद्रशेखर पानसकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे नितीन तारळकर यांनी फुटबॉलपटू मेसी याच्या अश्रूंविषयीची गोष्ट सांगितली एका कार्यक्रमात डोळ्यात आलेले पाणी टिपलेला टिशू पेपरचा लिलाव होऊन त्यातून कोटी रुपयाची निधी उभारला गेला .
खेळाडूला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले असून शासकीय नोकऱ्या मिळवताना याचा खूप मोठा फायदा होतो विविध पदांवर अधिकारी पदावर हे खेळाडू आता चमकत असून आपले स्वतःचे आरोग्य व आपल्या नोकरी व्यवसायाच्या वाटचालीत या खेळाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे .
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विभाग स्तर राज्यस्तर तसेच शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या विविध खेळांच्या सांघिक व वैयक्तिक पारितोषिकांचा वितरण समारंभ ही पार पडला. या कार्यक्रमाचे वेळी शाळेच्या घोष पथकाने सचिन राजोपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर स्वागत गीत तसेच विविध दोन वाजून उपस्थित आमचे मनोरंजन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे विविध विभागाचे शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेचे विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमास सर्व आजी माजी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी,पालक,सर्व हितचिंतकांनी मोठया संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
