लंडन, 21 जून (हिं.स.) : भारत
आणि इंग्लंड यांच्यातील हेडिंग्ले कसोटीत शानदार शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल
पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याचे कारण त्याची फलंदाजीची कामगिरी नाही तर
त्याचे काळे मोजे आहेत. खरंतर, इंग्लंडविरुद्धच्या
सामन्याच्या पहिल्या दिवशी गिल काळे मोजे घालून मैदानावर फलंदाजीला आला होता, जे आयसीसीच्या ड्रेस कोडच्या नियमांविरुद्ध
आहे.
कसोटी
क्रिकेटमध्ये पोशाखांबाबत आयसीसीचे कडक मार्गदर्शक तत्वे आहेत. आयसीसीच्या
नियमांनुसार क्रिकेटपटूंना सामन्यादरम्यान फक्त पांढरे, क्रीम किंवा हलके राखाडी रंगाचे मोजे घालावे
लागतात. एमसीसी नियम १९.४५ अंतर्गतस्पष्टपणे
सांगितले आहे की, या रंगांव्यतिरिक्तगडद रंगाचे मोजे घालण्यास परवानगी नाही. हा
नियम २०२३ मध्ये लागू करण्यात आला आणि तेव्हापासून जवळजवळ सर्व क्रिकेटपटू त्याचे
पालन करत आहेत.
हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवशी शुभमन गिल कॅमेऱ्याच्या नजरेतून
सुटला नाही. तो काळे मोजे घालून फलंदाजी करताना दिसला. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. आणि प्रश्न उपस्थित झाला आहे
की, हे नियमांचे उल्लंघन आहे का? यासाठी
काही शिक्षा होईल का ?
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
