धुळे, 28 डिसेंबर (हिं.स.) क्रीडा व युवा सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन व श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या सौजन्याने आयोजित राज्यस्तरीय 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या शालेय क्रिकेट स्पर्धा 2023 चे उद्धटन एस.व्ही.के.एम. मुकेश आर. पटेल स्कूल, तांडे, शिरपूर येथे काल भूपेश भाई पटेल, जॉईन प्रेसिडेंट एस. व्ही. के. एम. प्रेसिडेंट, धुळे डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धेच्या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, व्यवस्थापक कमिटी एस. व्ही. के. एम वाईस प्रेसिडेंट सी. एस,धुळे राजगोपाल भंडारी, शिरपूर पीपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चेअरमन योगेश भंडारी, शिरपूर पीपल को- ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन श्रीनिक जैन, सीईओ शिरपूर एज्युकेशन सोसायटी उमेश शर्मा, एस. इ. सी. स्पोर्ट्स डायरेक्टर प्रितेश पटेल आदी यावेळी उपस्थित होते.
काल झालेल्या क्रिकेट सामान्यात मुंबई विरुद्ध नागपूर सामन्यात मुंबई संघ विजयी तर पुणे विरुद्ध छत्रपती संभाजी नगर सामन्यात पुणे संघ विजयी, लातूर विरुद्ध कोल्हापूर कोल्हापूर विजयी तर अमरावती विरुद्ध नाशिक सामान्यात नाशिक संघ विजयी झालेत.
या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी 8 विभागातुन 200 खेळाडू, निवड चाचणी,व्यवस्थापक सहभागी झालेले आहे. ही स्पर्धा 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत एस.व्ही.के.एम. मुकेश पटेल स्कूल सीबीएससी, तांडे, शिरपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेचे तांत्रिक समिती मनोज पाटील, दुष्यंत पाटील, विजय सिसोदे, राहुल सुर्वे, जयवंत ठाकूर, निखील मोरे हे पाहणार आहेत. तसेच पंच म्हणून मयुरेश पवार, राहुल सुर्वे, गुण लेखक प्रफुल ठाकूर, अक्षय पवार, प्रंशात ढोले, वरून पाटील, ऋषी पंजाबी ,भावेश शर्मा, वेदान पंचभाई, पाहणार आहेत.या स्पर्धेसाठी इसवीके मुकेश आर पटेल स्कूल सीबीएससीचे दीपक जगताप, कुणाल गिरासे, किरण पाटील, धीरज पाटील, सुभाष पावरा, यांचे अनमोल सहकार्य लाभले.
हिंदुस्थान समाचार
