परभणी, 10 ऑक्टोबर, (हिं.स.)। विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत वाटर पोलो या खेळात स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, चाटोरी येथील विद्यार्थी कृष्णा घोगरे याने उत्तम कामगिरी करत 100 मीटर फ्री स्टाईल वॉटर पोलो या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कृष्णाच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी पाले, तालुका क्रीडा समन्वयक मोतीराम शिंदे, संस्थाध्यक्ष संदीप किरडे, सचिव सचिन जोशी, कोषाध्यक्ष सुभाष ढगे, प्राचार्य डी. बी. पवार, प्रा. उमेश काळे (क्रीडा विभाग) तसेच कोच थोरात शुभंकर सर आणि बालाजी सर यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
कृष्णा घोगरेच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून राज्यस्तरावरही चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
