ओटावा, 5 जुलै (हिं.स.) :
भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी
श्रीकांतने कॅनडा ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखली
आहे. त्याने चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनला पराभूत करून
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ४३ मिनिटांच्या उपांत्यापू्र्व फेरीच्या सामन्यात
श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ६ व्या स्थानावर असलेल्या चाऊ चेन या बॅडमिंटनपटूचा सरळ
गेममध्ये पराभव केला.
या
वर्षाच्या सुरुवातीला मलेशिया मास्टर्समध्ये उपविजेता राहिलेला माजी जागतिक
अजिंक्यपद रौप्यपदक विजेता श्रीकांतने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर
असलेल्या चेनला २१-१८, २१-९ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ४६ व्या क्रमांकावर असलेला
भारतीय बॅडमिंटनपटू श्रीकांतला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी जपानच्या तिसऱ्या
मानांकित केंटा निशिमोतोशी सामना करावा लागणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
