रत्नागिरी, 8 ऑक्टोबर : खेड तालुक्यातील वावे – चिंचाटवाडी विकास मंडळ (पुणे) या संस्थेचे सभासद हरिश्चंद्र सीताराम उतेकर यांची कन्या वृषाली उतेकर हिने जागतिक पातळीवर वाखाणलेल्या गोवा येथे आर जी मॅरेथॉन २१ किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिने २१ किलोमीटरचे हे अंतर अवघ्या १ तास ३३ मिनिटात पार केले. सरासरी एक किलोमीटर फक्त चार मिनिट २० सेकंदात पार करून प्रथम क्रमांक पटकावला.
भारतीय मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांच्याकडून तिला गौरवण्यात आले. तिची १५ ऑक्टोबर दिल्ली येथे होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
