अहमदनगर, 17 ऑक्टोबर : अहमदनगर शहरातील युवा खेळाडू स्केटिंग कार्तिक रत्नेश मिश्रा याने नेपाळ मधील पोखरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले.या कामगिरी मुळे त्याची दुबई मध्ये होणा ऱ्या साऊथ एशियन गेम्स २०२३ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नुकतीच नेपाळ मधील पोखरा येथे आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा पार पडली.यामध्ये विविध देशातील खेळाडू सहभागी झाले होते.मिश्रा याने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन २१ वर्ष वयोगटात सुवर्ण पदकाची कमाई करून आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप सोडली.साऊथ एशियन गेम्स मध्ये देखील त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.मिश्रा हा शहरातील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल व पॉलीटेक्निकचा माजी विद्यार्थी आहे.स्केटिंगचे दिवंगत प्रशिक्षक मनोज करपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्केटिंगचे धडे गिरवले आहे.सध्या तो स्वत: सराव करत असून,भारती विद्यापीठ पुणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या अनुराधा मिश्रा यांचा तो मुलगा आहे.
