चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा तब्बल ८ वर्षांनी परत एकदा आयोजित करण्यात येत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी संपूर्ण तयारी केली असून, स्पर्धेला १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे यजमान असून, हायब्रिड मॉडेलनुसार सामने खेळवले जातील. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. या स्पर्धेचे अधिकृत गाणे “जितो बाजी खेल के” लाँच करण्यात आले आहे.
BulletsIn
- स्पर्धेची पुनरागमन – २०१७ नंतर तब्बल ८ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा आयोजित केली जात आहे.
- स्पर्धेची सुरुवात – १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार असून, ९ मार्चपर्यंत चालणार आहे.
- यजमानपद – पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडे यजमानपद आहे, पण भारताचे सामने दुबईत होतील.
- हायब्रिड मॉडेल – काही सामने पाकिस्तानमध्ये, तर काही सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.
- स्पर्धेतील संघ – २०२३ वनडे वर्ल्ड कपमधील पहिल्या ८ संघांनी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
- संघांची विभागणी – ८ संघ २ गटांमध्ये विभागले आहेत:
- अ गट – भारत, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान
- ब गट – अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका
- एकूण सामने – या स्पर्धेत एकूण १५ सामने खेळले जातील.
- अधिकृत गाणे – “जितो बाजी खेल के” हे अधिकृत गाणे लाँच करण्यात आले आहे.
- गायक आणि निर्माते – प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम यांनी हे गाणे गायले आहे. निर्माता अब्दुल्ला सिद्दिकी असून, अदनान धुल आणि अस्फंदयार असद यांनी गाणे शब्दबद्ध केले आहे.
- गाण्याचा व्हिडिओ – गाण्याच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या विविध ठिकाणांची झलक दिसते आणि क्रिकेटप्रेमाचा उत्साह दाखवण्यात आला आहे.
