अमरावती, फेब्रुवारी : मागील 36 वर्षांपासून गाडगेबाबा क्रीडा मंडळाच्या/गाडगेबाबा बहुउद्देशिय संस्था वतीने कधी विदर्भ स्तरीय, कधी राज्यस्तरीय तर कधी राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धे चे आयोजन केल्या जाते. भव्य गॅल्लरी, लाल मातीचे मैदान, सुंदर सजावट व आतिषबाजी सोबतच योग्य नियोजन साठी प्रसिद्ध असे स्पर्धेचे उदघाटन दिनांक 23 फेब्रुवारी रोजी माजी पालक मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तर आमदार धीरजभाऊ लिंगाडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन होणार असून या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य हेमंतभाऊ काळमेघ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलुभाऊ शेखावात आदींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे.
स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रित्यर्थ आयोजित या स्पर्धे मध्ये आकर्षक पारितोषिके असून पुरुष गट विजयी संघास 51000 रुपये रोख स्व. सुशीलाबाई गुणवंतराव होले स्मृती प्रित्यर्थ श्री. रावसाहेब गुणवंतराव होले यांच्या तर्फे, उपविजेत्या चमूस स्व. मनोहरराव गुलाबराव बेलसरे स्मृती प्रित्यर्थ श्री. अनिरुद्ध उर्फ बबलू बेलसरे यांच्या तर्फे 31000 रुपये रोख, महिला गटात विजयी संघास स्व. उमाताई गजाननराव इंगोले स्मृती प्रित्यर्थ श्री. राजाभाऊ उर्फ जयंत गजाननराव इंगोले तर्फे 31000 रुपये रोख उपविजेता संघास स्व. दादासाहेब उर्फ रामदासपंत उगले यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री. सुनील रामदास पंत उगले यांच्या तर्फे 21000 रुपये रोख दिले जाणार आहे सोबतच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरिज, बेस्ट रेडर, बेस्ट पकड साठी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.सदर स्पर्धेचा थरार प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवावा असे आवाहन गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था /गाडगेबाबा क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी सभापती स्थायी समिती अमरावती महानगर पालिका बाळासाहेब भुयार व आयोजन समिती ने केले आहे.
