रत्नागिरी, 16 मार्च, : द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड येत्या रविवारी (१७ मार्च) चिपळूण येथे येणार आहेत.
चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे गेल्या ८ मार्चपासून दहा दिवसांची चिपळूण प्रिमियर लीग राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धा शहरातील पवन तलाव मैदानावर सुरू झाली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी, १७ मार्च रोजी होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. या समारंभाला लाड उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे तालुकाध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली.
दिनेश लाड रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांचे प्रशिक्षक आहेत. ते रेल्वेत सेवेत होते. त्यांचा मुलगा सिद्धार्थ लाड हाही रणजीपटू आहे. सध्या तो गोव्याकडून खेळतो.
