रत्नागिरी, 19 ऑक्टोबर, : रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील पुरुष वरिष्ठ गट फ्रीस्टाइल, गादी, माती ग्रीको-रोमन, वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली जिल्हा अजिंक्यपदाच्या कुस्ती स्पर्धा येत्या शनिवारी (दि. २१ ऑक्टोबर) होणार आहेत.
येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी ११ वाजता स्पर्धा होईल. स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील स्थानिक कुस्तीगिरांना भाग घेता येईल. यासाठी जन्मतारखेचा दाखला म्हणून आधार कार्ड, नगर परिषद, ग्रामपंचायत यांचा मूळ प्रतीमधील जन्म दाखला आणणे गरजेचे आहे. खेळाडूंनी रेशनकार्डाची मूळ प्रत आणणे आवश्यक आहे. येताना सोबत २ पासपोर्ट आकाराचे फोटो आणावे. वास्तव्याबाबत शंका किंवा तक्रार झाल्यास तसेच खेळासंबंधी कोणतीही तक्रार झाल्यास असोसिएशनचा निर्णय अंतिम राहील.
प्रवेश शुल्क वरिष्ठ गट पुरुष, गादी, माती, ग्रीको-रोमन गट २०० रुपये आणि प्रौढ गट महिला, कुमार गट मुले, मुली १०० रुपये अशी आहे. कुस्तीगिरांनी खेळण्याच्या गणवेशासह शनिवारी सकाळी वेळेवर उपस्थित राहावे. जिल्हा स्पर्धेसाठी स्वखर्चाने जाणे-येणे करायचे आहे. कुस्ती स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक कुस्तीगिरांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याबाबत सर्व अधिकार असोसिएशनकडे राहतील. राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या तारखांप्रमाणे वयोगटांच्या तारखांमध्ये बदल होईल. रवींद्र ऊर्फ अण्णासाहेब द्वारकानाथ सामंत (अध्यक्ष, श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी) यांच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण विलणकर (अध्यक्ष – ९४२३२९०७५४, सदानंद जोशी (प्र. कार्यवाह – ९४२२३७२२९६), डॉ. चंद्रशेखर केळकर (कार्याध्यक्ष), संतोष कदम (उपाध्यक्ष), अमित विलणकर (उपाध्यक्ष) योगेश हरचेरकर (सहकार्यवाह – ९४२३२९२३५०), वैभव चव्हाण (सहकार्यवाह – ९८८१७८८४५१), आनंद तापेकर (८८०५६६३३६६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
