नाशिक, २८ जानेवारी, : ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या ब्रह्मा व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन संस्थेत वार्षिक हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एच.एन. कुदळ यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयातर्फे क्रिकेट, बुद्धिबळ , कैरम , व्हॉलीबॉल इत्यादी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री राजारामजी पानगव्हाणे पाटील आणि संस्थेचे सरचिटणीस गौरव पानगव्हाणे पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. डॉ. धनिशा पानगव्हाणे पाटील यांनी सर्व सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेचछा दिल्या .
या प्रसंगी मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. संतोष पवार , इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ. मोहम्मद इक्रामुद्दीन , कॉम्पुटर विभाग प्रमुख डॉ अंजली भद्रे, सिव्हिल इंजिनीरिंग विभाग प्रमुख प्रा. कौस्तुभ सराफ , व्यस्थापन विभाग प्रमुख प्रा. विद्या पाटील, प्रथम वर्ष समन्वयक प्रा. प्रियांका काकडे उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनकरिता महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी प्रा. अजय धुमाळ तसेच प्रा. महेश वाणी, प्रा. प्रदीप पिंगळे , प्रा. गोकुळ जेऊघाले , प्रा. राहुल झोपे, प्रा. भगतसिंग राजपूत, डॉ. हर्षवर्धन घोंगडे, प्रा. करिष्मा अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
