cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > नमो चषक स्पर्धांना कल्याण पश्चिमेत मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा – कपिल पाटील
Sports

नमो चषक स्पर्धांना कल्याण पश्चिमेत मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा – कपिल पाटील

CliQ INDIA
Last updated: February 23, 2024 11:10 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

डोंबिवली, फेब्रुवारी : स्थानिक आणि तळागाळातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी आयोजित नमो चषक स्पर्धेला कल्याण पश्चिम मतदारसंघातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 30 हजार खेळाडू सहभागी झाले असून ही नक्कीच अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढले. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेत नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेला केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नमो चषक 2024 अंतर्गत विविध स्पर्धा खेळवल्या जात आहेत. या स्पर्धेमध्ये तब्बल 30 हजार इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून अतिशय भव्य स्वरूपात या स्पर्धा होत असून त्यामध्ये नक्कीच उद्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वासही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सह-कार्यालय मंत्री भरत राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघ आणि उत्कृष्ट खेळाडूंचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

आतपर्यंत चित्रकला, बुद्धीबळ, फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, 100 /400 मीटर धावणे, बॅडमिंटन, एकांकिका, वक्तृत्व, नृत्य, कबड्डी आदी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. तर पुढील दिवसांत व्हॉलीबॉल, कॅरम, रस्सीखेच, गायन या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. ज्याला आधी झालेल्या स्पर्धांइतकाच मोठा प्रतिसाद मिळत आहे.

खोखो पाठोपाठ कबड्डीतही नरेंद्र पवार यांनी दाखवले प्राविण्य :

काही दिवसांपूर्वी नमो चषकात झालेल्या खो खो स्पर्धेमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या खोखोपटूचे प्रदर्शन घडवले होते. राजकरणात एक कसलेला खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेल्या माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कालच्या कबड्डी स्पर्धेतही आपल्यातील कबड्डीपटूचे कौशल्य दाखवून दिले. प्रतिस्पर्धी संघावर चढाई करत अतिशय चपळपणे एक गडी बाद करत पवार यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखील चव्हाण, महीला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, कल्याण शहर मंडल अध्यक्ष वरूण पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अमित धाक्रस, प्रेमनाथ म्हात्रे, ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जून म्हात्रे, मा.नगरसेवक अर्जून भोईर, उपाध्यक्ष अनिल चौधरी, स्वप्निल काठे, कबड्डी स्पर्धेचे प्रमुख प्रताप टूमकर, सदा कोकणे, प्रदेश अनुसूचित मोर्चा उपाध्यक्ष डॉ. राजु राम, कल्याण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप पाटील, गौरव गुजर, क्रीडा संयोजक संजय कारभारी, व्यापारी आघाडी अध्यक्ष रवी गुप्ता, उमेश पिसाळ, विनोद मुथा, राजेश ठाणगे, लिगल सेल उपाध्यक्ष ऍड.समृध्द ताडमारे, महेंद्र मिरजकर, समृध्दी देशपांडे, स्नेहल सोपरकर, दिपा शाह, जनार्दन कारभारी, मिलींद सिंह, अनंता पाटील, अभिमन्यू पाटील, ठाणे जिल्हा कबड्डी असोशियनचे सर्व पंच, शाळेचे व इतर कबड्डी खेळाडू, संघ व्यवस्थापक, क्रीडा शिक्षक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

बीएमसी आयुक्तांनी कोणाच्या सांगण्यावरून काढली १२०० कोटी रुपयांची निविदा – अमोल मातेले
भारताकडून इंग्लंडचा 142धावांनी पराभव | BulletsIn
लाईटस..अॅक्शन..ले पंगा : प्रो कबड्डी लीगच्या १० व्या पर्वाला भव्य क्रूझवर प्रारंभ
जोपर्यंत सीमेवर शांतता नाही, तोपर्यंत भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिका नाही – सुनील गावस्कर | BulletsIn
कोहली, पडिक्कलच्या जोरावर आरसीबीने आयपीएल सामन्यात जीटला हरावले

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बायजूचे सीईओ रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर
Next Article अजिंक्य – हृताचे झाले ‘मन बावरे’
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?