वॉशिंग्टन डीसी, 17 ऑगस्ट (हिं.स.)
स्पेनचा कार्लोस अल्कारज आणि जगातील नंबर वन टेनिसपटू यानिक सिनर पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. अल्कारज आणि सिनर यांनी आपापले उपांत्य फेरीचे सामने जिंकले आहेत. आता हे दोन अव्वल टेनिसपटूंमध्ये सिनसिनाटी ओपनच्या विजेतेपदाच्या सामन्यात एकमेकांचे आव्हान असणार आहे. सिनरने फ्रान्सच्या टेरेन्स एटमानेचा ७-६, ६-२ असा पराभ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. हा सिनरचा हार्ड कोर्टवर सलग २६ वा विजय ठरला आहे.
दुसरीकडे स्पेनच्या कार्लोस अल्कारजने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करून टूर स्तरावर सलग सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अल्कारजने झ्वेरेव्हचा ६-४, ६-३ असा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अल्कारज आणि सिनर एकमेकांसमोर येण्याची ही सलग चौथी वेळ असेल. अल्कारझ आणि सिन्नर यांच्यामध्ये या हंगामात रोम, रोलँड गॅरोस आणि विम्बल्डनमध्ये अंतिम सामन्यात मुकाबल रंगला होता. अलिकडे यानिक सिनरने अलीकडेच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत अल्कारजचा पराभव केला होता.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
