बीड, 06 फेब्रुवारी (हिं.स.)। आदित्य शिक्षण संस्था संचलित आदित्य कृषी महाविद्यालयाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संघात पाच विद्यार्थ्यांची निवड करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. खो-खो आणि कबड्डी या प्रमुख खेळांमध्ये ही निवड झाली आहे. खो-खो संघात शेंडे सौरव, श्रीराम सानिका आणि वाघमारे शैलजा यांचा समावेश आहे. कबड्डी संघात कुंभार सुगंधा आणि खेडकर मनीषा यांची निवड झाली आहे. या यशामागे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत ठरली. संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा आणि अध्यक्षा डॉ. आदिती सारडा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. आदिती सारडा म्हणाल्या, ‘ही निवड केवळ खेळातील कौशल्यावर आधारित नाही. या गुणांमुळे विद्यार्थ्यांनी ही संधी शिस्त, सांघिक भावना आणि धैर्य मिळवली आहे.
विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही सातत्याने आपली छाप पाडत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर परिश्रम आणि क्रीडा शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आहे. आगामी स्पर्धांमध्येही ते निश्चितच उज्ज्वल कामगिरी करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे प्राचार्य शाम भुतडा यांनी सांगितल. हे खेळाडू विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis
