नवी दिल्ली, 28 ऑगस्ट (हिं.स.) भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानेकबूल केले की, तो त्याच्या तंत्रावर समाधानी नाही आणि मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये त्याने ९०+ मीटर फेक देखील परिपूर्ण नव्हता. चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकला होता आणि दुसरे स्थान पटकावले होते.
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता चोप्रा यांनी डायमंड लीग फायनलपूर्वी पत्रकारांना सांगितले की, मला वाटते की माझा रनअप वेगवान आहे. पण मी तो वेग वापरू शकत नाही. दोहामध्ये ९० मीटर फेक चांगला होता पण तांत्रिकदृष्ट्या तो परिपूर्ण नव्हता.
तो म्हणाला, जर माझा डावा पाय सरळ असेल आणि मी परिपूर्ण ब्लॉक वापरत असेल तर तो चांगला फेक असेल आणि मग मी माझ्या वेगावर समाधानी असेन. जेव्हा नीरजला विचारण्यात आले की, चांगल्या तंत्राने ९२ मीटर फेक करू शकतो.तेव्हा तो म्हणाला, भालाफेकीत काहीही सांगता येत नाही. तुम्ही चार किंवा पाच मीटर देखील जाऊ शकता.
भालाफेकमध्ये वाऱ्याच्या परिणामाबद्दल चोप्रा म्हणाला, ‘हे फेकणाऱ्यावर अवलंबून असते की, तो वारा कसा वापरतो. जर तुम्ही योग्य रेषेतून फेकत असाल तर ते मदत करते.’ झुरिचमध्ये उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे तो म्हणाला. प्रत्येक परिस्थितीत चांगली कामगिरी करायची आहे. उद्या हवामान चांगले नसेल, कदाचित पाऊस पडेल. परिस्थिती कठीण असल्याने आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत राहावे लागेल. मला प्रत्येक परिस्थितीत चांगली कामगिरी करायची आहे.’
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
