नवी दिल्ली, 03 मार्च (हिं.स.)भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. आयसीसीने दोन्ही उपांत्य सामन्यांसाठी सामन्याचे पंच आणि सामनाअधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. ख्रिस गॅफनी आणि अल्लाहुद्दीन पालेकर भारताच्या सामन्यासाठी मैदानी पंच असतील.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यासाठी रिचर्ड इलिंगवर्थ आणि अॅलेक्स व्हार्फ मैदानी पंच असतील, तर नितीन मेनन भारताचे तिसरे पंच असतील.
टी-२० विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना ४ मार्च रोजी कोलकाता येथे खेळला जाईल, जिथे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर येतील. रिचर्ड इलिंगवर्थ आणि अॅलेक्स व्हार्फ मैदानी पंच असतील, तर नितीन मेनन तिसरे पंच असतील. रॉड टकर हे चौथे पंच असतील आणि जवागल श्रीनाथ हे सामनाधिकारी म्हणून काम पाहतील.
दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी मुंबईत भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाईल. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी मैदानी पंच क्रिस गॅफनी आणि अल्लाहुद्दीन पालेकर असतील, तर एड्रियन होल्डस्टॉक हे तिसरे पंच म्हणून काम पाहतील. पॉल रायफल चौथे पंच म्हणून उपस्थित राहतील आणि अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकारी असतील.
२०२४ च्या उपांत्य सामन्यातही भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते, जिथे भारताने ६८ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्या सामन्यात ख्रिस गॅफनी देखील उपस्थित होते. सध्याच्या स्पर्धेत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या सामन्यांमध्ये मैदानी पंच म्हणूनही गॅफनी उपस्थित राहिले आहेत.
आयसीसी स्पर्धेत भारत आणि इंग्लंड पाचव्यांदा उपांत्य सामन्यात एकमेकांसमोर येतील. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत आहेत. विशेष म्हणजे, जेव्हा जेव्हा भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केले आहे, तेव्हा तेव्हा टीम इंडियाने विजेतेपदही पटकावले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
