नवी दिल्ली, 30 जून (हिं.स.)
जागतिक
सुपर कबड्डी लीग म्हणजेच डब्ल्यूएसकेएल या स्पर्धेचा पहिला हंगाम पुढील वर्षी
फेब्रुवारी-मार्चमध्ये दुबई येथे होणार आहे. या स्पर्धेत जवळापास ३० देशातील कबड्डीपटू
सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय
कबड्डी फेडरेशन अर्थातच आयकेएफच्या पाठिंब्याने जागतिक सुपर
कबड्डी लीगच्या
पहिल्या हंगामात आठ संघांचा समावेश असलेले फ्रँचायझी-आधारित मॉडेल स्वीकारणार येणार
आहे. प्रत्येक संघात भारतातील गुणवान कबड्डीपटूंचा समावेश तर असेलच. शिवाय
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूंना या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
कबड्डीला
नेहमीच केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक क्रीडा जगतासाठीही एका मोठ्या व्यासपीठाची
आवश्यकता आहे. जागतिक सुपर कबड्डी लीग सोबतआमचे ध्येय जागतिक प्रेक्षकांना या खेळाकडे
आकर्षित करणे,युवा कबड्डीपटूंना नवे व्य़ासपीठ खुले
करुन देणे आणि ऑलिंपिक मान्यता मिळवण्यासाठी निर्णायक पावले उचलणे आहे, असे लीग चालवणाऱ्या एसजे अपलिफ्ट कबड्डी प्रायव्हेट लिमिटेडचे
संचालक आणि संस्थापक संभव जैन यांनी सांगितले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
