ऑकलंड, 19 जून, (हिं.स.) अमेरिकन
फलंदाज मोनक पटेलने मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये इतिहास रचला आहे. मोनक पटेल एमएलसीच्या
इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करणारा अमेरिकन फलंदाज ठरला आहे. त्याने कोरी
अँडरसनचा ९१ धावांचा विक्रम मोडित काढला.
मोनक पटेल या स्पर्धेत एमआय न्यूयॉर्क संघाकडून
खेळत आहे. सिएटल ऑर्कास विरुद्धच्या सामन्यात त्याने स्फोटक फलंदाजी केली. आणि ५० चेंडूत ९३ धावा केल्या. मोनकने ८ चौकार आणि ७ षटकार या खेळीमध्ये मारले. त्याच्या शानदार
कामगिरीमुळे मोनकला सामनावीराचा किताब देण्यात आला.
मेजर
लीग क्रिकेटच्या या सामन्यात सिएटल ऑर्कास संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली.
२० षटकांत ५ गडी गमावून त्यांनी 200 धावा केल्या. त्यानंतर एमआय न्यूयॉर्क संघाने १९ षटकांत ३ गडी गमावून 203 धावा केल्या. आणि हा सामना ७ गडी राखून जिंकला.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
