वॉशिंग्टन, ३० नोव्हेंबर (एचएस) इंटर मियामीने पहिल्यांदाच मेजर लीग सॉकर कप फायनलमध्ये प्रवेश केला. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली संघाने ईस्टर्न कॉन्फरन्स फायनलमध्ये न्यूयॉर्क सिटी एफसीचा ५-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयासह संघाने एमएलएसच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
ईस्टर्न कॉन्फरन्स फायनलमध्ये तादेओ अलेंडेने शानदार हॅटट्रिक केली, तर माटेओ सिल्वेट्टी आणि टेलसास्को सेगोव्हिया यांनी प्रत्येकी एक गोल केला. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू कार्लोस अल्कारज देखील ईस्टर्न कॉन्फरन्स फायनल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता.
मेस्सीचा देशबांधव आणि अर्जेंटिनाचा संघ सहकारी तादेओ अलेंडेने इंटर मियामीच्या विजयात मोठी भूमिका बजावली. अलेंडे उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने शानदार हॅटट्रिकसह संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आठ वेळा बॅलन डी’ओर विजेता मेस्सीनेही या सामन्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. मेस्सीने आता त्याच्या क्लब आणि राष्ट्रीय संघासाठी एकूण ४०५ असिस्ट केले आहेत, जे फुटबॉल इतिहासातील कोणत्याही फुटबॉलपटूपेक्षा सर्वाधिक आहेत.
एमएलएसमधील सर्वात यशस्वी संघ एलए गॅलेक्सी आहे. ज्याने २०२४ पर्यंत विक्रमी सहा एमएलएस कप विजेतेपदे जिंकली आहेत. डीसी युनायटेड चार विजेतेपदांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलंबस क्रूने तीन विजेतेपदे जिंकली आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
