cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > आशिया कपमध्ये संघातून डावलल्यानंतर श्रेयस अय्यरने अखेर मौन सोडले
Sports

आशिया कपमध्ये संघातून डावलल्यानंतर श्रेयस अय्यरने अखेर मौन सोडले

CliQ INDIA
Last updated: September 9, 2025 6:37 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर (हिं.स.) श्रेयस अय्यरने आशिया कपसाठी दुर्लक्षित केल्याबद्दल अखेर प्रतिक्राया दिली आहे. तो म्हणाला की, जेव्हा तुम्हाला माहित असते की, तुम्ही संघात किंवा अंतिम ११ मध्ये असण्यास पात्र आहात. आणि तुम्हाला संधी मिळत नाही तेव्हा ते निराशाजनक असते. आशिया कप २०२५ मंगळवारपासून सुरू होणार आहे. भारत १० सप्टेंबरला भारत या मालिकेत आपला पहिला सामना खेळणार आहे. या स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आलेला नाही.

आता श्रेयस अय्यरने आशिया कप संघात दुर्लक्षित झाल्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. ‘जेव्हा तुम्हाला माहित असते की, तुम्ही अंतिम ११ मध्ये संघात राहण्यास पात्र आहात तेव्हाच निराशाजनक असते. त्यावेळी ते निराशाजनक असते. पण त्याच वेळी, जेव्हा तुम्हाला माहित असते की, कोणीतरी सातत्याने संघासाठी चांगली कामगिरी करत आहे आणि सर्वोत्तम कामगिरी करत आहे. तेव्हा तुम्ही त्याला पाठिंबा देता. शेवटी ध्येय संघाचा विजय आहे आणि जेव्हा संघ जिंकत असतो तेव्हा प्रत्येकजण आनंदी असतो. पण मी प्रामाणिकपणाबद्दल नेहमी म्हणतो की, जर तुम्हाला संधी मिळाली नाही तर तुम्ही तुमचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहात याची खात्री करावी लागेल. असे नाही की, तुम्हाला फक्त कोणीतरी पाहत असतानाच कामगिरी करावी लागेल. कोणीही पाहत नसतानाही तुम्ही तुमचे काम करत राहिले पाहिजे. हा प्रामाणिकपणा आहे.’

अय्यर म्हणाला की, कोणत्याही क्रिकेटपटूसाठी तयारी खूप महत्वाची आहे कारण ती दीर्घकाळात अपयशाची शक्यता दूर करते. तो पुणे म्हणाला की, ‘आम्ही नेहमी म्हणतो की, तुम्हाला तुमच्या तयारीवर विश्वास ठेवावा लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःला एका विशिष्ट पद्धतीने तयारी करता तेव्हा मैदानावर जे काही घडते ते मैदानाबाहेरील तुमच्या कामगिरीचे प्रतिबिंब होत असते. जर तुमची तयारी योग्य असेल तर सर्वकाही फक्त एक प्रतिबिंब असते. अपयश केवळ एकदा किंवा दोनदाच येऊ शकते. त्यापेक्षा जास्त नाही. जर तुमची तयारी चांगली असेल आणि जर तुम्ही एक किंवा दोन सामन्यात चांगली कामगिरी केली नाही तर तिसऱ्या सामन्यात तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी कराल. हे मी अनुभवले आहे.’

श्रेयस अय्यर शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून खेळताना दिसला होता. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आणि संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली होती. यावर तो म्हणाला, ‘भारतासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे ही आतापर्यंतची सर्वोत्तम भावना होती.’

उजव्या हाताचा हा फलंदाज ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू होणाऱ्या दोन चार दिवसांच्या सामन्यांच्या मालिकेत भारतीय अ संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रेयसला आशिया कप संघात दुर्लक्षित केल्यापासून प्रश्न उपस्थित केले जात होते. चांगल्या फॉर्ममध्ये असूनही तो संघात स्थान मिळवू शकला नाही. आयपीएल २०२५ मध्ये अय्यरने १७ डावांमध्ये ६०४ धावा केल्या. आणि त्याची सरासरी ५०.३३ आणि स्ट्राईक रेट १७५.०७ होता. त्याने ६ अर्धशतकेही झळकावली होती.

—————

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

You Might Also Like

अहमदाबादमध्ये होणाऱ्या २०३० च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये १७ खेळांचा समावेश होण्याची शक्यता
बाजीराव खाडे काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत
फ्रेंच ओपन: रोमांचक सामन्यात स्विटेकने ओसाकाचा पराभव केला, अलाकार्सनेही आगेकूच केली
महाराष्ट्राचा सुवर्ण षटकार : ॲथलेटिक्समध्ये पदकांची लयलूट
नगरमधील ओपन चेस टुर्नामेंटमध्ये ठाण्याचा विक्रमादित्य कुलकर्णी विजेता | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफकडून अटक
Next Article एआयद्वारे आक्षेपार्ह फोटोंवर ऐश्वर्या रायची हरकत, दिल्ली हायकोर्टाचे हटवण्याचे आदेश
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?