पुणे, 5 ऑक्टोबर, (हिं.स) खडबडून जागे झालेल्या ससून रुग्णालय प्रशासनाने अत्यावश्यक असलेल्याच कैद्यांना रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्याची ‘क्लीन आउट’ मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दोन रुग्णांची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीतील प्रमुख सूत्रधार ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला.
या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात कैद्यांना मिळत असलेल्या ‘विशेष’उपचारांची माहिती उघड झाली. त्यानंतर ससून रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी कैदी रुग्णालयातून परत कारागृहात पाठविण्याची ‘क्लीन आउट’ मोहीम सुरू केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
