– सहा वेगवेगळ्या बोलीतील सात एकांकिका होणार सादर
मुंबई, ११ जानेवारी (हिं.स.) : बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवार, १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. अंतिम फेरीत सहा वेगवेगळ्या बोलीतील सात एकांकिका सादर होणार आहेत.
संगमेश्वर, कोल्हापुरी, व-हाडी, घाटी, मालवणी, सामवेदी कुपारी, घाटी या बोलीभाषेतील एकांकिका स्पर्धेत सादर होणार आहेत.
सकाळी नऊ वाजल्यापासून शिवाजी मंदिर, दादर येथे स्पर्धेला सुरुवात होणार असून www.tickethub.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीटे उपलब्ध आहेत. शिवाजी मंदिर नाट्यगृहावर तिकिट विक्री सुरू असून तिकिटाचे मूल्य प्रती तिकीट ५० रुपये इतके आहे.
हिंदुस्थान समाचार
