चंद्रपूर 7 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे 8 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
रविवार 8 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, चिमुर येथून मोटारीने कोलारी चिमुरकडे ते प्रयाण करतील. सकाळी 9.15 वाजता ते चिमूर तालुक्यातील कोलारी येथे येतील. कोलारी व साठगांव येथे नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी करतील. सकाळी 9.45 वाजता मोटारीने भिसी येथे जाऊन नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी आणि विठ्ठल रुखमाई जिनिंग अँड प्रेसिंग, भिसी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
सकाळी 10:30 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालय, चिमूर येथे आगमन झाल्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा, नुकसानीच्या अनुषंगाने ई-पिक पाहणी, पिक विमा आढावा, वहिवाट रस्ते, सातबारा संगणीकरण, लम्पी आदीबाबत चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक.
दुपारी 12.10 वाजता आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट देतील. दुपारी 12:45 वाजता वहानगांव (बोथली) येथे नुकसानग्रस्त भागाची पिक पाहणी करून दुपारी 1.30 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
हिंदुस्थान समाचार
