मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वेने आपल्या विभागांमध्ये जाहिरातींद्वारे नॉन-फेअर कमाई करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत मध्य रेल्वेने त्याच्या ५ विभागांमध्ये विविध जाहिरातींच्या माध्यमातून ५४.५१ कोटी रु. ची प्रभावी कमाई केली आहे. या कालावधीतील जाहिरातींमधून मिळणाऱ्या कमाईचे विभागनिहाय विभाजन खालीलप्रमाणे आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर-२०२३ पर्यंतच्या जाहिरातींमधून विभागनिहाय महसूल (कोटी रु.)
धोरण
मुंबई
भुसावळ
नागपूर
सोलापूर
पुणे
एकूण
ट्रेनच्या डब्यांवर विनाइल रॅपिंग
७.३१
०.०६
०.००
०.०१
०.८१
८.१९
स्थानकांवर होर्डिंग जाहिराती
२३.६४
०.२७
०.६७
०.४५
३.५८
२८.६१
स्थानकांवर टीव्ही स्क्रीन जाहिराती
१५.४९
०.६०
०.३८
०.४०
०.८६
१७.७२
एकूण
४६.४४
०.९२
१.०५
०.८६
५.२५
५४.५१.
उत्पन्न झालेला महसूल भाडे नसलेल्या महसुलाच्या स्त्रोतांची मजबूत क्षमता दर्शवितो आणि मध्य रेल्वेच्या त्याच्या विभागांमध्ये नाविन्यपूर्ण जाहिरात उपायांचा लाभ घेण्याची वचनबद्धता अधोरेखित करतो. ट्रेनच्या डब्यांवर विनाइल रॅपिंग, स्थानकांवर होर्डिंग जाहिराती आणि टीव्ही स्क्रीनवरील जाहिरातींच्या माध्यमातून, मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव वाढवून मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवसायांसाठी आकर्षक संधी निर्माण केल्या आहेत.
प्रवासी सेवा आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या वृद्धीमध्ये योगदान देऊन, नॉन-फेअर महसूल वाढवण्यासाठी नवीन संधी आणि नाविन्यपूर्ण जाहिरात धोरणे शोधण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध आहे.
हिंदुस्थान समाचार
