छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार व सामाजिक केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन अतिशय उत्साहपूर्ण व भक्तिभावाने झाले.
कुटुंबियांच्या उपस्थितीत बाप्पाचे स्वागत करण्यात आले आणि मंगल आरती करून बाप्पाच्या चरणी सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करण्यात आली.
गणेशोत्सव हा केवळ सण नाही, तर श्रद्धा, संस्कृती आणि ऐक्याचा प्रतीक आहे. या पवित्र पर्वामुळे घराघरांत आनंद, सकारात्मकता आणि मंगलमयतेचे वातावरण नांदो, अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis
