रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) : देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयात १०१ दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
या अंकात वयम, घरचा वैद्य, योगासने, संत उपासना, रुचिरा, समाज सुधारक, मनोकल्प, ऋतुरंग, फुल मनोरंजन, कुलदेवता, क्रिक कथा, रेकी, दीर्घकथा, बालकुमार, वेदांतश्री, पोलीस टाइम्स, पद्मगंधा, तंत्र मंत्र तोडगे, संगम, स्वरसाज, चित्रलेखा, गुरुदेव दत्त, गर्भसंस्कार, गोष्टी पाण्याच्या, अलका, अक्षरवेध, हेर, वसुधा, सुगंध, दुर्ग, समतोल, संस्कार बोध, भ्रमंती, रागिणी, शब्द शिवार, साहित्य लक्ष्मी, मिळून साऱ्या जणी, अक्कलकोट स्वामी दर्शन, व्यापारी मित्र, मधु मित्र, दीपोत्सव, किशोर, तारांगण, पुढारी, दीपस्तंभ इत्यादी अंकांचा समावेश आहे.
या दिवाळी अंक योजनेचे सभासद होण्यासाठी तीन महिन्यांचे १५० रुपये शुल्क भरून त्वरित सभासद व्हावे, असे आवाहन जी. के. जोशी यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
