नाशिक, १६ नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. आकाश छाजेड आणि माजी सभागृह नेते. राजेंद्र बागुल नाशिक शहर काँग्रेस शिक्षक विभागाचे अध्यक्ष विलास निकुंभ यांच्या नेतृत्वाखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पणत्या लावून अनोखे आंदोलन केले.
यावेळी ऍड. आकाश छाजेड म्हणाले, की सरकारच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी आम्ही पणत्या लावत आहोत आणि लवकरच या पणतीची मशाल करून आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करा ही प्रमुख मागणी करत आहोत. जुन्या पेन्शन योजने करता काँग्रेस पक्ष मोठा लढा उभा करेल असे उद्गार आकाश छाजेड यांनी काढले तसेच ज्येष्ठ नेते श्री. राजेंद्र बागुल यांनीही सरकारच्या भांडवलशाही निर्णयांवर हल्ला केला, पुढे ते म्हणाले की सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे त्यामुळेच काँग्रेसचा समृद्ध काळ पुन्हा आणायचा आहे. शिक्षक विभागाचे अध्यक्ष श्री. विलास निकुंभ यांनीही सरकारच्या सुलतानी धोरणांचा जाहीर निषेध केला.
यावेळी उल्हास सातभाई, आशाताई तडवी, शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, संदीप शर्मा, नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, नाशिक शहर अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, सातपूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कडलक, जावेद इब्राहिम, इसाक कुरेशी, फारुख कुरेशी, समीना पठाण, साजिया शेख, कुसुम चव्हाण, उषाताई साळवे अजिनाथ नागरगोजे, फारूक मन्सूरी, ज्ञानेश्वर काळे, राजकुमार जेफ, प्रकाश माळी, संतोष हिवाळे, अब्दुल गणी शेख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हिंदुस्थान समाचार
