cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > केडीएमसी महापौर व उपमहापौर पदासाठी महायुतीतून अर्ज दाखल
Regional

केडीएमसी महापौर व उपमहापौर पदासाठी महायुतीतून अर्ज दाखल

CliQ INDIA
Last updated: January 31, 2026 6:33 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

डोंबिवली, 30 जानेवारी (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन या निवडणुकीत एकूण १२२ नगरसेवक निवडून आले. आता महापौर व उपमहापौर पदासाठी तीन फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा आणि मनसे यांची महायुती असून महापौर पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी थवील व उपमहापौर पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे या दोघांनी अर्ज दाखल केले आहेत.

महापालिका सचिव कार्यालयात महापौर व उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करताना यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकुमार (नंदू) परब, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील, नगरसेवक दीपेश म्हात्रे, रमेश सुकऱ्या म्हात्रे तसेच महापौर पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी व उपमहापौर पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक संदर्भात महायुतीचे उमेदवार सौ. हर्षाली चौधरी थवील व राहुल दामले हे शिवसेना व भाजपचे दोन्ही विजयी नगरसेवक आहेत त्यांनी महापौर व उपमहापौर असे उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खास करून मनसेचे राजू पाटील, राज ठाकरे यांचे देखील खूप खूप धन्यवाद त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एक मोठी ताकद कल्याण डोंबिवलीत झाली आहे. शिवसेना भाजपा मध्ये आता मनसेची भर पडली आहे. येणाऱ्या तीन तारखेला महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून येतील असा पूर्ण विश्वास आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही धन्यवाद. आता एमएमआरडीए परिक्षेत्रात सगळीकडे महायुतीचे महापौर उपमहापौर येणार हे दिसून येईल. लाडक्या बहिणीनी महायुतीला पाठिंबा दिला. आता त्याच लाडक्या बहिणींचा सन्मान महायुतीतील सर्वांनी केला आहे. आमची लाडकी बहिण येणाऱ्या काळात महापिलीकेचा कारभार पाहणार आहे.

यापूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. ही मोठी हानी आहे. ही महाराष्ट्र व देशाची हानी आहे. एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल आहे. ही मोठी पोकळी कधी करून न येणार अशीच आहे. आपण कधीही विचार केला नव्हता अशी परिस्थिती येईल. अजितदादा आपल्याला सोडून गेले हे दुःख प्रत्येक महाराष्ट्राच्या मनात आहे. नेहमी प्रशासनावर पकड, शिस्तप्रिय अशी दादांची ओळख आहे. आपण सर्वजण त्यांच्या परिवारांच्या दुःखात सहभागी आहोत.

—————-

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi

You Might Also Like

कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद- नितीन गडकरी
डोंबिवलीतील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर मनसेने विचारला जाब
भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार
सोलापूर : नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण , डेमु सेवासह रेल्वेस थांबा देण्याची मागणी
बाळासाहेब थोरात यांची शिवसेनेच्या यादीवर नाराजी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुण्यातील महाळुंगे येथे गोदरेज प्रॉपर्टीजकडून सुमारे 8.5 एकर भूखंडाचे संपादन
Next Article पीटी उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे निधन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?